शेळीपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काय करावे ? How to get success in goatfarming ?

शेळीपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काय करावे ? How to get success in goatfarming ? 

या ब्लॉगद्वारे शेळी पालन मध्ये यशस्वी होण्यासाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत , कोणत्या मुद्द्यांवर तुम्हाला जास्त लक्ष द्यावे लागेल हे मी आज सांगणार आहे.

शेळीपालन व्यवसाय यशस्वी करण्यासाठी काय करावे ?  How to get success in goatfarming ?


 शेळीपालन करताना तुम्हाला आवड असणं सर्वात महत्त्वाचा आहे. शेळीपालनामध्ये चालू करणे, हा तुमचा स्वतःचा निर्णय हवा आहे , जर एखाद्याचा तुम्ही नफा कुणाचा तोटा , शेळीपालन मधून येणारा इन्कम हे सर्व गोष्टी जर तुम्ही बघून जर शेळी पालन मध्ये उतरणार असाल तर त्याचा काही उपयोग नाही . मी आत्ता सांगतो तुम्ही शेळी पालन करू नका , जर ह्या गोष्टी बघून तुम्ही शेळीपालन चालू करणार असाल तर .


 शेळी पालन करणे हे तुम्हाला मनापासून आवडायला हवं . 

शेळीपालनामध्ये बरीच अडीअडचणी येतात त्या अडचणींवर मात करून शेळीपालन कसे यशस्वी बनवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे 


      •  काही महत्वाचे मुद्दे जाणून घेणे 

      1. खरच (investment)
      2. महत्त्वाची बाबी ( important thing )
      3. शेळी निवड ( breed selection)
      4. चारा व्यवस्थापन ( feed management)
      5. शेळी ला लागणारे औषध ( medicine)
      6. शेळी विक्री ( market)


आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला चार-पाच महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे


  1. पहिला मुद्दा म्हणजे शेळीपालनात पहिल्या जो खर्च होतो तो प्रथम खर्च, नवीन शेड, नवीन शेळी खरेदी , त्यांचा चारा खुराक खरच इत्यादी. 

असे एक एक शेळीपालक आहेत , त्यांना असे वाटते की शेळीपालन चालू करताना आपला शेड मोठे पाहिजे , पण तुम्ही एक लक्षात घ्या , शेळीपालन मधून तुम्हाला पैसे येणार आहेत शेळ्यांमधून पैसे येणार . असं नाही की ते जर तुमच्या शेड मोठा असेल तर त्या शेड मधून पैसे येणार आहेत ! अशी बरेच लोक आहेत जे थोडक्या जागेत एकदम कमी खर्चात शेड बांधून सुद्धा शेळीपालन सुरू करतात .


 जोपर्यंत तुमच्याकडे पैसा येत नाही तोपर्यंत तुम्ही असे छोट्याजागी किंवा कमी खर्च करून सुद्धा शेळी पालन चालू करू शकता , जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच मोठी करायची असेल तर तुम्ही शेळ्या विकत घ्या , असं नाही की , तुम्ही घेणार चार-पाच शेळ्या आणि त्यासाठी तुम्ही दोन-तीन लाख रुपये खर्च करून शेड बांधता , तुम्ही शेडवर खर्च न करता शेळ्यांवरती आणि शेळ्यांना लागणारे खुराकावरती खर्च करू शकता असे माझे मत आहे.


तुम्ही शेळी पालन चालू करताना ५०% टक्के हा खर्च जो होतो तो तुम्ही शेळ्या वरती करू शकता शेळ्या विकत घेणे वगैरे, 25% शेड वरती खर्च करू शकता, आणि इतर म्हणजे चार व्यवस्थापन औषध शेळ्यांना लागणारे खुराक यावरती तुम्ही बाकीचा 25% खर्च करू शकता .ही

2. इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर तुम्हाला " शेळी सोबत शेळी व्हायला लागेल

कारण शेळीपालनामध्ये पावसाळा लागला की बरीच घाण होते ती घाण तुम्हाला सहन करता यायला हवी नाहीतर नंतर एकदा शेळीपालन चालू केले तुम्ही लाख-दोन लाख रुपये त्यात गुंतवले त्यानंतर जर तुम्हाला ती घाण वाटू लागली, ते तुम्ही एकदम बंद केला तर ते मोठा नुकसान होणार आहे तुमचं , शेळीपालनामध्ये घाण वाटते म्हणून जर तुम्ही कामगार लावून मजदूर लावून जर काम करणार असाल तरीही त्याचा उपयोग नाही .


3.शेळीपालना मधील तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ब्रिड  selection म्हणजेच जात कोणती असायला हवी , which breed should use for start-up goat farming


आपल्या शाळेचे , तर तुम्ही आता नुकताच शेळीपालनाचा गोठा चालू करणार आहेत त्यासाठी तुम्हाला चांगल्या वंशावळीची शेळी घेणे महत्त्वाचे आहे .

कारण जर तुम्ही आता खराब वंशावळची जर शेळी घेतली तर ज्या शेळीमधून तुम्हाला उत्पन्न येणार आहे ते सुद्धा एवढंच म्हणाव असे चांगले येणार नाही तेच येणारा फायदा देखील कमी येईल , त्यामुळे तुमची चांगली ब्रीड सिलेक्शन झाली पाहिजे बीड सिलेक्शन ही कशी करायची हे मी तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये सांगेन .


4.शेळीपालनातील चौथा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे फीड मॅनेजमेंट चारा व्यवस्थापन   feed management 


या फीड मॅनेजमेंट मध्ये महत्त्वाचे तीन मुद्दे पहिला म्हणजे खुराक जो आपण शेळीला देणार आहे . दुसरा म्हणजे सुखाचारा आणि तिसरा ओला चारा.


 , आता तुम्ही शेळी पालन करायचं निर्णय घेतला तुम्हाला आवड आहे तुम्ही बरोबर फायनान्शिअल मॅनेजमेंट सगळे बरोबर केला आहे . आता महत्वाचा मुद्दा येतो म्हणजे त्या शेळ्यांना लागणारा चारा , 


यामध्ये महत्त्वाचे म्हणजे खुराक म्हणजे शाळांना काय गरजेचे आहे कोणते न्यूट्रियंट शेळीला कमी आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे , त्यामुळे शेळ्यांना अनेक प्रकारचे रोग ही टाळता येतात , शेळीचा खुराक कसा करायचा ततो खुराक तयार करता आला पाहिजे जर येत नसेल तर हे सुद्धा गोष्ट मी तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये नक्की सांगेन. 


या खुराकासोबत शेळीला सुखाचाराही आवर्जून द्यायला हवा एक टाईम तरी सुखाचा चारा द्यायलाच हवा एका शहरीला साधारण एक किलो सुखाचारा दिला पाहिजे जर तुमच्याकडे बारा महिने जरी सुखाचारा उपलब्ध असेल तरीही काही हरकत नाही बारा महिने जरी सुखाचारा दिला तरीही चालेल


यासोबत शेळीपालनातील फीड मॅनेजमेंट मधील तिसरा मुद्दा म्हणजे ओला चारा ,  


जेवढा तुमचा ओला चारा पौष्टिक आहे तेवढा तुमचा सुक्या चाऱ्यावरचा आणि खुराकावरचा खर्च हा कमी होतो , शेळीपालनासाठी जर तुमच्याकडे एक एकर जागा असेल तर त्यामध्ये पाच-पाच गुंठे जागा पकडून त्यामध्ये तुम्हाला दशरथ घास , मेथिघस , शिवरी , शुभबळ , तुती, हतिघास. असे इत्यादी चारा लावलं पाहिजे , या ओल्या चाऱ्यामुळे शेळी चे पोट भरले जाते आणि शेळी पूर्णपणे चांगली रवत केली जाते . ओला चाराते त्यावेळेस शेळीला वेगळ्या प्रकारचा थोडा थोडा चारा दिला पाहिजे. शेळी हा एक असा प्राणी आहे त्याला एक सारखा चारा रोज रोज खाऊ वाटत नाही , त्याला रोजच्या चाऱ्यांमध्ये अनेक प्रकारचे गवत आणि अनेकप्रकारची वनस्पती दिली तरी ते आवडीने खाल्ली जाते .


5 . त्यानंतर शेळीपालना मधील 5 आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मेडिसिन शेळीला लागणारे औषध goat medicine 

शेळीपालना मधील जादा खर्च तर औषधं वरती होतो , शेळीला होणारे मुख्य रोग म्हटलं तर ताप , सर्दी , खोकला आणि त्वचारोग, शेळी ही सतत पावसाळ्यामध्ये आजारी पडते, ती न पडण्यासाठी काही काळजी घेतली जाते . कलजी घेऊन सुद्धा ती आजारी पडू शकते , पण जर ते आजारी पडल्यानंतर जर तुम्ही डॉक्टरांची जर वाट बघत असाल आणि प्राथमिक उपचार जर तुम्हाला करता आला नाही तर, तो रोक वाढू शकतो तो आजार वाढू शकतो . तुम्हाला शेळी पालन चालू करताना प्राथमिक उपचार सुद्धा माहित असले पाहिजेत .  

या शाळेमध्ये अनेक प्रकारचे लसीकरण ही केले जाते . तुम्ही त्या शेळीला प्रॉपर वेळच्यावेळी जर तुम्ही लसीकरण केले आणि तर शेळीचे 70 ते 80 टक्के रोग हे नाहीसे होतात तुमच्या शेळ्या आजारी पडू शकत नाही . 


 तुम्ही शेळीला वेळोवेळी जर तुम्ही जंतनाशक देत असाल तर शेळीने खाल्लेल चारा सुद्धा तिच्या अंगी लागतो , जर तुम्ही शिर्डीला जंतनाशक दिले नाही, तर शेळी जो चारा खाते जे खुराक खाईल ते शेळी कमी आणि ती जंत जादा खातात, शेळीच्या पोटामध्ये अनेक प्रकारचे जंत वाढल्यामुळे किंवा आपण जो चारा देतो त्यामुळे बाहेर जीवी जंत शेळीच्या पोटामध्ये वाढतात , त्यामुळे शरीरात जंतनाशक ही वेळोवेळी द्यायला हवं.


लहान पिल्लांना महिन्याच्या महिन्याला जंतनाशकाचा औषध दिले पाहिजे मोठ्या शेळीला व बोकडांना तीन महिन्यातून एकदा जंतनाशकाचा औषध दिले पाहिजे हे औषध देता वेळेस तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्की

 घ्या कारण शेळीला वेगळे औषध असते , घाबन शेळी ची विशेष काळजी आणि औषध असते.


6 .त्यानंतर शेळीपालना मधील शेवटचा मुद्दा म्हणजे मार्केटिंग शेळी बोकड विकायची कुठे ? Best goat market ? 


जर समजा तुम्ही शेळी पालन नीट केले , सगळे गोष्टी व्यवस्थित पद्धतीने पूर्ण केल्या . तुम्ही शेळीपालनांमधून बरच उत्पन्न निर्माण केलं आणि मोठ्या प्रमाणत बोकड तुम्ही तयार केले तर , ते बोकड तुम्ही घरी तर ठेवू शकत नाही . त्याला योग्य खरीददार आणलं पाहिजे प्रॉपर किंमत भेटली पाहिजे.

तर तुम्ही फायद्यामध्ये राहशीला .

 जर तुम्ही एखाद्या ब्रिडरला जर देत असाल बोकड तुमचं तर तुम्हाला तिथे फायदा भेटेल जर तुम्ही एखाद्या खटक्याला जर देत असाल जो मटन तोडतो , तर तो तुमच्या बोकडाची किंमत पूर्ण डाऊन करून मागू शकतो पूर्ण कमी करून मागू शकतो .

 म्हणजे समजा जर तुमचं बोकड दहा हजाराचा असेल तर तो पाच हजारापासून मागायला चालू करतो, ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्ष द्यायला हवे , जे बोकड तुम्ही विकणार आहात ते बोकड तुम्ही विकायला बाजारात आठवड्याचा जो बाजार होतो त्या , बाजारात सुद्धा जाऊ शकता .


शेळी पालन चालू करताना जर तुम्ही ह्या सर्व गोष्टी पूर्णपणे नीट लक्ष देऊन केल्या तर शेळी पालन 100% यशस्वी होते

Comments

Popular posts from this blog

प्रोटीन सी ( protein c ) या औषधाबद्ल सखोल माहिती . Protein c for goat full information .