पावसाळ्याच्या दिवसात शेळ्यांची काळजी कशी घ्यावी ? Goat precautions in rainy season
आजचा टॉपिक : पावसाळ्याच्या दिवसात शेळी ची काळजी कशी घ्यावी ?
या विषयावर मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे
शेळी हा प्राणी सहसा आजारी पडत नाही पण पावसाळा म्हणलं की 100 मधले 90% ह्या शेळ्या पावसाळ्यामध्ये आजारी पडतात . त्या पडू नयेत म्हणून आपण थोडी काळजी घ्यावी तिन्ही ऋतूंपैकी पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूमध्ये शेळीला खूप जपायला लागतात तर सध्या पावसाळा चालू आहे म्हणून मी हा ब्लॉग लिहीत आहे तर चला बघूया
पाऊस म्हटले की शेळी आजारी पडणे हे होतेच पावसाळ्यात शेळीची काळजी कशी घ्यावी कोणत्या गोष्टींवर जास्त लक्ष द्यावे ही मी आज तुम्हाला सांगणार आहे
नक्की पावसाळ्यात असं काय होते की त्यांना पावसाळी दिवसात शेळी आजारी पडते
पावसाळ्यात दिवसात ज्यावेळी अति प्रमाणात पाऊस पडतो त्यावेळेस गोठ्यात ओलावा निर्माण होतो त्यावेळेस शेळीला त्याच्यापासून अनेक प्रकारची रोगराई वाढते शेळीला त्यापासून त्रास होतो , शेळ्यांचे पायाचे खुरा ओली झाली की शाळांना सर्दी ही हमखास होते . वेळेत जर तुम्ही त्या सर्दी वर उपचार नाही केला तर ती सर्दी पुढे निमोनिया मध्ये सुद्धा बदलू शकते त्यामुळे शेळी दगावण्याचा सुद्धा धोका निर्माण होतो तुम्हाला प्राथमिक उपचार म्हणून सुद्धा काही औषधे हे आपल्या गोठ्यामध्ये ठेवायला हवेत.
जेवढी शेळीला तुम्ही कोरड्या ठिकाणी ठेवाल तेवढे . त्या शेळी साठी चांगले असते . पावसाळी दिवसात सगळीकडे पाणी असते किंवा ओलावा असतो , नवीन शेळीची पिल्ले ही पावसाळ्यात अनेकदा मरण पावतात शेळी पावसात एकदा भिजली तर शेळी आजारी पडते शेळीला ताप होत सर्दी होते अनेक आजार होतात.
यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या गोठ्यात ओलावा टिकून द्यायचा नाही त्यासाठी तुम्ही एक तर तुमचा गोटा पूर्ण पॅक बंद केला पाहिजे , किंवा तुम्ही तुमच्या शेडमध्ये पांढरी चूनी किंवा फक्की मिळते त्याचा वापर करा त्यामुळे ओलावा जादा राहत नाही , जिथे पाणी साठते तिथे जरा ती चुनी मारली तरी चालेल पावसाच्या दिवसात अनेक प्रकारचे जंत विषाणू वाढत असतात ती वाढू नये म्हणून तुम्ही गोट्याच्या आजूबाजूला सुद्धा ती पांढऱ्या चुन्याचा वापर करू शकता
पावसाळ्याच्या दिवसात शेळींना ओला चारा चे प्रमाण कमी करावे आणि ज्यादा करून सुखाचारा द्यावे थंडीच्या दिवसात किंवा पावसाळ्याच्या दिवसात शेळ्या पाणी कमी पितात तर तुम्ही लक्ष द्यायचं की ती पाणी भरपूर प्यायला हवी भरपूर म्हणजे तिच्या प्रमाणावर तरी. त्यासाठी तुम्हाला सुक्या चाराचे भरपूर वापर करावा लागेल त्यासाठी तुम्ही थोडं फार मीठ जरी टाकले तरी चालते किंवा त्या नंतर जे तुम्ही तिला पाणी देणार आहे , त्या पाण्यामध्ये थोडा गुळ टाकायचा त्यामुळे शेळी तरतरीत होते व पाणी सुद्धा आवडीने पिते .
त्यानंतर एखादी शेळी जर समजा आजारी पडली तर त्या शेळी वरती लक्ष ठेवायचे की कोणती शेळी आजारी आहे , जी शेळी आजारी आहे त्या शेळीला त्या ग्रुपमधून मधुन बाजूला काढायचे बाजूला बांधायचे ज्यामुळे इतर शेळ्यांवरती परिणाम होणार नाहीत. पावसाची दिवसात पोटॅशियम पर मॅग्नेट नावाची पुढे मिळते त्या पुडीचा तुम्ही वापर सुद्धा करू शकता , ते पोटॅशियम परमॅग्नेट तुम्ही पाण्यामध्ये टाकून त्याचा वापर एक सॅनिटायझर म्हणून करू शकता
पावसाळा चालू होण्याअगोदर तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये किंवा शेडमध्ये अनेक प्रकारचे सुक्या चाऱ्याचे नियोजन केले पाहिजे जेणेकरून तुम्ही ओला चाऱ्याऐवजी सुखाचारा वापरू शकता
.png)
Comments
Post a Comment